देगलूर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

 

 

देगलूर प्रतिनिधी,दि.०२ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील मराठी , हिंदी व इंग्रजी विभाग व स्वा. रा. ती म विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “साहित्य, समाज आणि संस्कृती “ या विषयावर दि. २ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

चर्चासत्र उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर हे राहणार आहेत तर उद्घाटक व बीजभाषक म्हणून प्रसिद्ध समीक्षक डॉ. विश्वनाथ शिंदे तसेच हिंदी विषयाचे बीजभाषक म्हणून श्रीमती सुशीला टाकभोरे आणि इंग्रजी विषयाचे डॉ. संध्या तिवारी हे उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

प्रस्तुत चर्चासत्रासाठी देशातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक यांच्याकड़ून शोधनिबंध मागविन्यात आले आहेत. ते पुस्तक व संशोधन पत्रिकेच्या स्वरूपात प्रकाशित केले ज़ानार आहेत.

 

 

 

समारोप कार्यक्रम संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार यांच्या अध्यक्षतेखाली होनार असुन याप्रसंगी नांदेड विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ अजय टेंगसे व सहयोगी अधिष्ठाता डॉ विकास सुकाळे राहनार आहेत.

 

 

 

चर्चासत्र कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हनून संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार हे राहनार आहेत.

 

 

 

प्रस्तुत चर्चासत्र यशस्वी करन्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाख़ाली ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, मराठीभाषा संयोजक डॉ विठ्ठल जंबाले, हिंदी भाषा संयोजक डॉ संतोष येरावार , इंग्रजी भाषा संयोजक प्रा ए आर डांगे , उपप्राचार्य एम एम चमकुडे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी , यांच्यासह विविध समितीतील प्राध्यापक, कर्मचारी नियोजन करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *