देगलूर प्रतिनिधी,दि.०२ :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या नुकत्याच झालेल्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ रत्नाकर लक्षटे यांची राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड केली.
सदरील निवड महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या तरतुदी नुसार करण्यात आली.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार राज्यशास्त्र विषयाचा पदवी व पदव्युत्तर वर्गाचा अभ्यासक्रम बनवणे व राज्यशास्त्र विषयाशी संबंधित अन्य शैक्षणिक कार्य करण्यासाठी झाली.
ग्रामीण भागातील महाविद्यालयास हा बहुमान मिळाला आहे. प्रा डॉ रत्नाकर लक्षटे हे देगलुर महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर राज्यशास्त्र वर्गास अध्यापन करत आहेत. राज्य शास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत एकुण ०४ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली मार्फत त्यांनी महाराष्ट्रातील लिंगायत समाजाची सामाजिक- आर्थिक व राजकीय स्थिती व समस्यांचा अभ्यास या विषयावर बृहद प्रकल्प पुर्ण केला.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली मार्फत त्यांना एक राष्ट्र एक चूनाव की सामाजिक- आर्थिक एंव राजनीतिक उपलब्धिया और चूनोतियो का अध्ययन या विषयावर बृहद संशोधन प्रकल्प मंजुर झाला आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतुन जवळपास १०० शोध लेख लिहले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्य स्तरीय चर्चासत्र व परिषदेत साधन व्यक्ती म्हणून सहभाग घेतला आहे.
महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय व राज्य स्तरीय कार्यशाळा,चर्चासत्र व परिषदेचे आयोजन करण्यात सहभागी असतात. अश्या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय प्रा डॉ रत्नाकर लक्षटे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वच वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.
या निवडी बद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंब्रेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायण मैलागिरे, सह सचिव सूर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार , कार्यकारिणी सदस्य राजकुमार महाजन, डॉ. कर्मवीर उनग्रतवार, गंगाधर जोशी, जनार्दन चिद्रावार, रवींद्रअप्पा द्याडे, देवेंद्र मोतेवार,चंद्रकांत नारलावार प्राचार्य डॉ मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार , उप प्राचार्य एम एम चमकुडे व पर्यवेक्षक प्रा संग्राम पाटील, प्रसिद्धीप्रमुख डॉ बी आर कतुरवार , कार्यालयीन अधिक्षक गोविंद जोशी यांनी अभिनंदन केले.
राज्यशास्त्र विभागातील प्रा डॉ चोले माधव व प्रा सोनकांबळे मल्हारी यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी ही अभिनंदन केले.