हिंगोली, दि.१४ :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट सन २०२२-२३ VCDS मध्ये राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा काल दिनांक १३ मार्च, २०२३ पासुन सुरु झाला आहे.
हा अभ्यास दौरा दि. १३ मार्च ते १५ मार्च, २०२३ पर्यंत राहणार आहे. या दौऱ्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे व प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अमलबजावणी कक्ष (स्मार्ट ) युवराज शहारे यांनी हिरवी झेंडू दाखवून सहल रवाना केली.
समुदाय आधारित संस्था यांची संचालक, सभासद हे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, राहुरी कृषी विद्यापीठ, FPO राहुरी व सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी दिंडोरी नाशिक येथे भेट देणार आहेत.
यावेळी नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा तज्ञ जी. एच. कच्छवे, समुदाय आधारित संस्था यांचे संचालक व सभासद हजर होते.