राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाची नांदेड दक्षिण विधान सभा मतदारसंघ कार्यकारणी जाहीर.

नांदेड प्रतिनिधी, दि.१८:
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल जाधव यांच्या नेतृत्वाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कार्यकारिणी आज जाहिर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा शहर जिल्हा पक्ष निरिक्षक सौ.आशाताई भिसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.कल्पनाताई डोंगळीकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधूताई देशमुख,सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल जाधव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे शहर जिल्हा कार्यालय,नांदेड येथे आयोजित पक्षाच्या शहर जिल्हा आढावा बैठकीत पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विकी पाटील कळकेकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी हनुमंत जयसिंग ठाकुर,दक्षिणच्या उपाध्यक्षपदी
आकाश आनंद सिंग ठाकूर, सरचिटणीस पदी
पवनसिंग राजूसिंग ठाकूर, सचिवपदी गिरीश गोपाळराव जाधव आदींची निवड करण्यात येऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी कळकेकर म्हणाले.

नवनियुक्त पदाधिकारी यांचे सर्वस्तरातून स्वागत व अभिनंदन होत असून पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापुरकर,राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगावकर,बंटी लांडगे,शहर जिल्हा सरचिटणीस सय्यद मौला,उत्तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी,दक्षिण विधानसभा अध्यक्ष गंगाधर कवळे पाटील, दत्ता पाटील तळणीकर,युनूस खान,शफी उर रहमान,नितीन मामडी आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *