देगलूर प्रतिनिधी,दि.२५ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे बीएससी तृतीय वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी कु.वैभवी सुनेपवार हिने फेब्रुवारी २०२३ मध्ये पार पडलेल्या जॉईंट ऍडमिशन फॉर
एम एस सी अर्थात जाम ह्या परीक्षेत रसायनशास्त्र या विषयात यश संपादन केले .
ही परीक्षा यावर्षी आयआयटी गुवाहाटी ने घेतली होती . ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तीला भारतातील वेगवेगळ्या आयआयटी किंवा एनआयटी मध्ये उच्च शिक्षण घेता येईल.
या परीक्षेकरिता तिला रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ अनिल चिद्रावार , डॉ. पोकलवार राजकुमार, प्रा. विनोद काळे, प्रा.गणेश क्यादारे यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार
महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे ,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे