स्वा.रा.ती.म.विद्यापिठ मुक्ला संघटनेच्या अध्यक्षपदी डाॅ.अनिल जाधव
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररीयन्स असोशिएशन (मूक्ला) ची नुकतीच ऑन लाईन पध्दतीने निवडणूक संपन्न झाली. सदर निवडणुकीचा निकाल नाशिक येथे संपन्न झालेल्या संघटनेच्या सहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदे दरम्यान आयोजित सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी यांच्या वतीने मूक्ला असोशिएशनचे महासचिव डॉ. विनय पाटील यांच्या द्वारे जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्रातील ११ विद्यापीठांमध्ये २०२३ -२०२८ या कालावधीकरिता दि. ८ फेब्रुवारी २०२३ ला अध्यक्ष पदासह एकूण १२२ पदांकरिता निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु होवून दि. १५ मार्च २०२३ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच ११ विद्यापीठांमधील १२१ पदाधिकारी यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलज लायब्ररीयन्स असोशिएशन महाराष्ट्रातील महाविद्यालयीन ग्रंथपाल तसेच विद्यापीठाचे ग्रंथपाल, उपग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल यांना संघटीत करून त्यांच्या व्यावसायिक अडीअडचणी व समस्या दूर करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी काम करते.
ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाशी संबधीत तसेच ग्रंथालयाच्या उन्नतीकरिता विविध कार्यक्रम, परिषदा, सेमिनार, व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग इ. आयोजन व प्रयोजन करून तसेच सभासदांच्या ग्रंथपालन व्यवसायासंबंधित शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाबरोबर संपर्क ठेवून आवश्यक ती कार्यवाही करून ग्रंथपालांच्या अनेक समस्या सोडविण्यात संघटनेला यश मिळाले आहे.
सदर संघटनेची स्थापना युनियन अँक्ट, १९२६ अंतर्गत ३ मे २०१४ रोजी डॉ मोहन खेरडे यांच्या अध्यक्षते खाली झाली. संघटनेचे स्वत:चे न्यूजलेटर असून संघटनेव्दारे उत्कुष्ट ग्रंथपाल पुरस्कार, उत्कुष्ट संशोधन लेख पुरस्कार तसेच लघु संशोधन प्रकल्प करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. अशी माहिती मूक्ला असोशिएशनचे महासचिव डॉ. विनय पाटील यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रात सभासद असलेल्या ११ विद्यापीठामधील १२२ पदधिकारी वर्गाची बिनविरोध निवड होणे म्हणजे संघटनेतील प्रत्येक सभासदाने समाजात एक आदर्श संघटना कशी असावी हा संदेशच दिला आहे.
या निवडणुकीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मुक्ला विभागीय मंडळा मध्ये ११ पदधिकारी निवडून आले आहेत त्यामध्ये समन्वयक डॉ. अनिल व्यंकटराव जाधव, सह-समन्वयक डॉ. विक्रम विठ्ठल गिरी, सचिव डॉ. गोविंद सूर्यभान घोगरे, सहसचिव डॉ. विलास अशोकराव काळे, कोषाध्यक्ष डॉ. शिवाजी नारायणराव सोनटक्के, तसेच सदस्य म्हणून डॉ. जगदीश नरहरराव कुलकर्णी, श्री. राजेश बळीराम गोरे, डॉ. उद्धव रामराव आघाव, डॉ. रामदास भगवानराव टेकाळे,रंतनाबाई देवराव पालकर, सविता सदाशिवराव अवचार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील निवडून आलेले सर्व पदाधिकारी यांचे इंडियन लायब्ररी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मोहन खेरडे सर यांनी अभिनंदन केले आहे तसेच मूक्ला असोशिएशनचे महासचिव डॉ. विनय पाटील व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदीश कुलकर्णी सर यांनीही अभिनंदन केले आहे तसेच स्वारातीम विद्यापिठ नांदेड विभागातील सर्व शैक्षणिक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.
please visit our new portal www.newsrajya.com