मुखेड प्रतिनिधी,दि.११ :- दैनिक युवा मराठा न्यूजच्या वऱ्हाणे तालुका मालेगाव येथील पत्रकार भवनासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मुखेड येथे दैनिक युवा मराठाचे जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय मुखेड येथे निवेदन देण्यात आले.
युवा मराठा वृत्तपत्र व न्यूज चैनल चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपल्या माध्यमातून वऱ्हाणे, ता. मालेगांव येथील पत्रकार भवन जागा मागणीच्या प्रश्नावरुन गेल्या तीन वर्षापासून अनेकदा मालेगांव पंचायत समिती कार्यालयासमोर विविध प्रकारची आंदोलने केलीत, मात्र प्रशासनाने लेखी आश्वासने देण्यापलिकडे ठोस व निर्णयात्मक कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
म्हणून राजेंद्र पाटील राऊत यांनी पुन्हा दिनांक १० एप्रिल २०२३ पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या प्रश्नावर तात्काळ जागेवरच निर्णय व्हावा. गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या या लढयातील सगळ्या मागण्या त्वरीत सोडविण्यात याव्यात यासाठी काल दिनांक १० रोजी आमरण उपोषण चालू केलेला आहे आजचा दुसरा दिवस आहे.तरी सदरील अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य करावे पुढील होणाऱ्या परिणामाला शासन जबाबदार राहणार असे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी दैनिक चालू वार्ताचे तालुका प्रतिनिधी शिवकुमार बिरादार पत्रकार, टीव्ही सह्याद्री न्यूजचे मुख्य संपादक विठ्ठल पाटील येवतीकर, तरुण भारत तालुका प्रतिनिधी संजय कांबळे, उद्याचा मराठवाड्याचे तालुका प्रतिनिधी भास्कर पवार,व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनसोडे आदी उपस्थित होते.