एसटी अधिकाऱ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे देगलूरात प्रवाशांना ‘नाथजल’ चे पाणी मिळेना.

   हैदराबाद मेट्रो सिटी लगत        संपर्क :- ९८९०४७६५९५

देगलूर प्रतिनिधी,दि.१८ :- बस स्थानक परिसरात प्रवाशांची सोय व्हावी म्हणून एसटीने करार केलेल्या ‘नाथजल’ म्हणजेच एसटी प्रवाशाला कमी पैशात फिल्टर पाणी मिळण्यासाठी एसटी महामंडळाने राज्यात एका पाण्याच्या कंपनी सोबत केलेला करार.पण ते नाथजलचे पाणी देगलूर येथील एसटी प्रवाशाला मिळत नसल्याचे दिसून येत आहे,अशा अनेक प्रवाश्याची तक्रार

 

 

 

 

 

 

 

 

येत असल्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी संबंधित वितरक सतीश दोमकोंडवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि बस स्थानक मधील अन्य दुकान परवानाधारक परवाना नसताना देखील ‘नाथजल’ सोडून इतर कंपन्याचे पाणी त्यांच्या स्टॉलवर बेकायदा विक्री करत आहेत व त्यासाठी त्यांना आतील कर्मचाऱ्यांचाा पाठिंबा आहे.

आम्ही माणसे ठेवून ‘नाथजल’च्या पाण्याची बाटली बसमध्ये प्रवाशापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न देखील केले,पण अन्य स्टॉल धारक व काही कर्मचारी याचा विरोध करत असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

 

 

 

 

त्यांच्या म्हणण्यानुसार बसस्थानकामधील अन्य दुकानदार इतर परवाने असताना देखील गुटका,सिगारेट,बिडी,व अन्य पदार्थ व इतर कंपन्यांच्या पाण्याची विक्री अधिक भावात सर्रास विक्री करत आहेत व त्यासाठी त्यांना आतील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे.एसटी मधील अन्य कर्मचाऱ्याचा पाठिंबा त्या स्टॉल धारकांना मिळत असल्यामुळेे ते स्टॉल धारक आम्हाला ‘नाथजल’ चे पाणी विक्रीपासून रोखत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क:- 9890476595

या संदर्भात डेपो मॅनेजर यांनी लक्ष घातले तरच नाथजलचे पाणी प्रवाशापर्यंत मिळेलअसेही त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत डी.एम. साहेब काय लक्ष घालतात याकडे प्रवाशाचे लक्ष लागले आहे.