‘नाथजल’च्या बातमीवर डी.एम.चा खुलासा

 

देगलूर प्रतिनिधी,दि.१८:- आमच्या महिमा खादीचा या लोकप्रिय पोर्टलच्या माध्यमातून देगलूर आगारातील प्रवाशांना ‘ नाथजल’चे पाणी प्रवाशांना मिळेना अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

 

    हैदराबाद मेट्रो सिटीच्या लगत संपर्क 9890476595

वास्तविक ही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी आम्ही डीएम साहेबांशी भ्रमणधणी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता खरा पन ढगाळ वातावरणामुळे त्यांच्याशी काही संपर्क झाला नव्हता तोपर्यंत ही बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर

 

 

 

 

त्यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की ‘नाथजल’चे पाणी बस स्थानक परिसरात विकण्यास कोणीही विरोध करू शकत नाही ‘नाथजल’चे पाणी हे एसटीच्या प्रवाशाच्या सोयीसाठीच आहे.पण मध्यंतरीच्या काळात नाथ जलचे स्टॉल वारंवार बंद राहत आहे. त्याबद्दल स्टॉल धारकाला

 

 

 

 

सूचना देखील केली गेली होती.आणि यंदा कडक उन्हाळा देखील असल्यामुळे प्रवाशाची गैरसोय पाहता अन्य स्टॉल धारकांनी नाईलाजाने इतर कंपनीचे पाणीे ठेवले असेल आणि बस मध्ये

 

 

 

 

 

चढून पाणी विक्री करण्यासाठी आगारातून वेगळा परवाना काढावा लागतो सदरील स्टॉल धारकाने रीतसर परवाना घेऊन तसेच नेहमीच स्टॉल सुरू ठेवून प्रवाशाचे होणारी गैरसोय टाळावीआगारा कडून त्यांना नेहमी मदत केली जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:- 9890476595