देगलूर प्रतिनिधी, दि.१९: -देगलूर बिलोली, मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी जनतेच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरोना काळातील अन्नधान्य वाटप असो की विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर असो यातुन आपली वेगळी भूमिका घेत त्यांनी जनमत तयार केले आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीतचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रा. उत्तमकुमार कांबळे मित्रमंडळाकडून जनतेशी संवाद साधत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.
तालुक्यातील खानापूर, कावळगाव, करडखेड, मरखेल, क्यादरकुंटा, हाणेगाव, होट्टल, काठेवाडी, कुशावाडी आदी गावांत जाऊन प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.