पंतप्रधानांच्या अविरत कर्मयोगातून विकसित भारत साकार होणार.

 

देगलूर दि.२२:- वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशाला एक सामर्थ्यशाली पंतप्रधान लाभले असुन मा. नरेंद्र मोदी यांच्यारूपांने अष्टपैलू व अविरत कर्मयोगी नेतृत्व देशाला लाभले आहे. सन २०१४ पासून ते आज तागायात दररोज ब्रह्ममुहूर्तापासून ते मध्यरात्रीपर्यत अविरत राष्ट्रसेवा करित आहेत.

आज विकसित भारताचा अमृत काळ असुन सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्ष पूर्ण झाली आहेत.संपूर्ण जगामध्ये भारताची एक विकसित व महासत्ताक राष्ट्र स्वरूपामध्ये विकास होत आहे याचे श्रेय मा.नरेंद्र मोदी साहेबांना जाते. आजपर्यंत असंख्य लोक कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून भारतातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास योजनांचे लाभ थेट त्यांच्या बैंक खात्यात जमा करून ग़रीबांचे कल्याण साधले जात आहे. सन २०४७ मध्ये भारत विश्वगुरू , महासत्ताक व विकसित राष्ट्र स्वरूपात निर्माण

 

 

 

 

होणार असून त्याचे श्रेय निश्चितच नरेंद्र मोदी साहेबांना जाते असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले.ते भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या व्यावसायिक व बुद्धिवंत संमेलनामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री संतुकराव हंबर्डे होते तर व्यासपीठावर आ. जितेशजी अंतापूरकर (आमदार, देगलूर विधानसभा), अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

प्रकाश पाटील बेंबरेकर , डॉ. माधव पाटील उच्चेकर (जिल्हा सरचिटणीस तथा अभियान जिल्हा संयोजक) , अ.व्या.शिक्षण संस्था उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, कार्यकारी मंडळ सदस्य सूर्यकांत नारलावार, नारायनराव मैलागीरे , चंद्रकांत नारलावार , विजय उंग्रतवार, प्राचार्य डॉ मोहन खताळ, माणिकराव लोहगावे, अनिल पा. खानापुरकर शंकरराव कंतेवार उपस्थित होते.

 

 

 

प्रारंभी शहराध्यक्ष प्रशांत दासरवार यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी कत्तुरवार यांनी केले आभार प्रा. संग्राम पाटील यांनी मानले.याप्रसंगी विविध विकास योजनाच्या प्रदर्शनीचे उद्घाटन संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष अशोक साखरे , दीपक संगमकर यांच्यासह प्रतिष्टीत नागरिक , प्राध्यापक वकील, डॉक्टर, पत्रकार, व्यावसायिक, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.