देगलूर प्रतिनिधी दि.२२ :- महाराष्ट्रात सर्वत्र शरदचंद्र पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत असताना देखील देगलूर तालुक्यात एकाही कार्यकर्त्याने पक्षांतर केले नव्हते. परंतु दि.२२ जून रोजी एड.अंकुश देसाई देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
दि.२२ जून रोजी नांदेड येथील जाहीर कार्यक्रमात माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाचे देगलूर तालुका अध्यक्ष अंकुश देसाई_देगांवकर यांच्या सोबत रमेश शिवनीकर (माजी पंचायत समिती सदस्य,देगलूर), सौ.तारकेश्वरीताई पाटील (महिला तालुकाध्यक्ष, देगलूर), शशांक पाटील (तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अच्युत पाटील (माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर), अशोक देशमूख (चैनपूर), गुलाब पाटील ( सरपंच कुशावाडी), माधव दासवाड (माजी सरपंच
होट्टल), राजू पाटील मलकापूरकर (संभाजी ब्रिगेड), कृष्णा माळेगांवकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो विधार्थी-युवक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, कार्यकर्त्यांनी अजीत पवार गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगांवकर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र), ओम पोकर्णा (माजी आमदार), मोहन हंबर्डे (माजी आमदार),अविनाश घाटे (माजी आमदार), दिलीपराव धर्माधिकारी (दक्षिण जिल्ह्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नांदेड), रामदास पाटील सुमठाणकर (महाराष्ट्र कार्याध्यक्ष, अपंग सेल),
शिवराज पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती,जि. प नांदेड), राहुल देसाई देगांवकर (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देगलूर),यादवराव देसाई (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, देगलूर), अनिकेत पाटील राजूरकर (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर), संतोष सावकार नारलावार (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती,देगलूर), संभाजी पाटील मुकनर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र), बाबू पाटील आलूरकर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,देगलूर)
देगलूर शहराचे नेते दिगंबर कौरवार, अशोक कांबळे देगलूरकर (शहराध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस) व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. देगलूर तालुक्यातील अनेक धडाडीचे आणि सक्रिय कार्यकर्ते अजित पवार गटात गेल्यामुळे तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला खूप मोठे खिंडार पडले आहे.