देगलूर प्रतिनिधी, दि.२५:-देगलूर आगाराला मिळालेल्या तीन बसेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले देगलूर आगारातील डीएम माननीय श्री अकूलवार
साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या बसेसचे लोकार्पण पण पार पडले यावेळी बालाजी मैलागिरे, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, बस आगारातील पदाधिकारी ड्रायव्हर, कंडक्टर, तसेच प्रवासी उपस्थित होते. याचवेळी देगलूर हैदराबाद या बसचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या उत्कृष्ट वाहक श्री व्हि.व्हि. पडलवार यांचा देखील सत्कार करण्यात आला.