दंतुलवार सोपान मरखेलकर (मदनूर) दि ०२ : आज मदनूर मंडळाच्या गावात टी.आर.एस. पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला.तेलंगणा राज्य सरकारचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज दिल्लीत तेलंगणा टीआर एस इमारतीची पायाभरणी करून बांधकामाला सुरुवात केली आहे. या कार्याची आठवण म्हणून आज तेलंगणाच्या गाव-गावात टीआरएस पक्षाचा झेंडा फडकवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात प्रसंगी. प्रमुख पाहुणे आणि पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी मदनूर मंडळाच्या ३८ गावांचे सरपंच, एमपीटीसी, नेते, कामगार उपस्थित होते मदनूर स्थानिक सरपंच दर्शवार सुरेश आणि मदनूर मंडळ टीआरएस पार्टी अध्यक्ष संगमेश्वर, आणि टाउन पार्टी अध्यक्ष कांचीनवार हनमंडलू, आर. सुभाष, गोपनवार शिवाजी, तुमवार हनमंडलू, राचावर खुशाल, बाबूमियान, गोपाल पांचाळ, एरकाल बलराम, सालुमियन, विद्यासागर वाघमारे आदी उपस्थित होते.