कुंडलवाडी रुपेश साठे,दि.०२ : गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर १९६४ या वर्षी विश्व हिंदू परिषद ची स्थापना करण्यात आली होती. आज गोकुळाष्टमी आहे त्या अनुषंगाने ३० ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर या दरम्यान नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे विश्व हिंदू परिषदेचे कार्य हिंदू एकत्रीकरण, लव्ह जिहाद, गोरक्षण, राम मंदिर आंदोलन इत्यादीवर विहिंप काम करत आहे दरम्यान आज कुंडलवाडी येथे श्री विठ्ठल साई मंदिरात विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण व भारत मातेची प्रतिमेची पुजा करण्यात आली विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष श्री मुकेश जी जोशी, शिवप्रसाद मदनुरवार यांचे विहिंप वर भाषणे ही झाली. या वेळी विश्व हिंदू परिषद शहर मंत्री शेखर खांडरे, विहिंपचे गोरक्षा प्रमुख नागेश पालाकृतीवार, बजरंग दल शहरसंयोजक गजानन झपलकर, सहसंयोजक अजय गोनोलवार,सचिन बिल्लावार, रमेश नागुलवार,साईनाथ माहेवार, प्रशांत दुसरवाड, सौरव कळसाईत, शिवा सावळे, शिवमनी नागुलवार, कृष्णा तेलकेश्वर निलेश पाटक, साई तेलकेश्र्वर, विहिंप व बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.