कुंडलवाडी– रुपेश साठे दि.०६ :
दिनांक- ०७/०९/२०२१ रोजी ११:०० वाजता नगरपरिषद कुंडलवाडी येथील सभागृह येथे कुंडलवाडी शहरातील व पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रतिष्ठीत नागरीक/जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, विविध राजकीय पदाधिकारी, उद्योजक/व्यापारी, आजी माजी लोकप्रतिनिधी/ नगरसेवक, पत्रकारसंघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी/ सदस्य इत्यादी यांना कळविण्यात येते की पोलिस स्टेशन कुंडलवाडी यांच्या वतीने श्री गणेश उत्सव, पोळा सना निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली असुन सदर बैठक मा. विक्रांत गायकवाड साहेब उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग धर्माबाद यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस. पठाण व पी.एस.आय विशाल सूर्यवंशी यांनी केले आहे.