कुंडलवाडी –रुपेश साठे दि.०६ -०९-२०२१ :
येथील रहिवाशी गोविंदराव रामराव अर्जुने यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे तीन वाजताच्या सुमारास निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी शहरातील भारतीय हटकर समाजाच्या स्मशान भूमीत सायंकाळी ५ वाजता करण्यात आली आहे. तर त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, जावई, सुना, आणि नात- नातवंडे असा परिवार आहे.
ते माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील अर्जुने यांचे मोठे बंधू तर हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. लक्ष्मणराव पाटील अर्जुने यांचे पुतणे होत.
त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.