देगलूर प्रतिनिधी, दि.१७ : देगलुर तालुक्यातील युवकांचा राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश.
राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष हरीहरराव भोसीकर साहेब यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष, शशांक पाटिल मुजळगेकर , युवा पॅंथर तालुकाध्यक्ष विकास नरबागे, युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष किटू कावटवार यांचा सह कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला .यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश देशमुख शिळवनीकर साहेब , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मिकांत पदमवार साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर साहेब , जांबळूकर सर , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य अनिल भाऊ तोताडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर विधानसभा अध्यक्ष शिवकुमार डाकोरे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष ओमकार उल्लेवार , नामदेव पाटिल , अत्री पाटिल , बालाजी पाटील औराळकर , विशाल बोरगावकर , गंगाधर कांबळे , आदि उपस्थित होते .