ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेधार्थ आ.डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वात मुखेड मध्ये आंदोलन
मुखेड ता.प्रतिनिधी. ज्ञानेश्वर कागणे दि.१७ :
ओबीसी समाजाचा विस्वासघात करणाऱ्या व ओबिसी आरक्षण आरक्षणाशिवाय निवडणूका घेणाऱ्या आघाडी सरकारचा जाहिर निषेध करीत मुखेडमधे आ.डॉ.तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन तहसीलदार काशिनाथ पाटिल यांना निवेदन सादर करण्यात आले.
आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजु मांडन्यासाठी वकिलच दिला नाही,गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षना बाबत टोलवाटोलवी करीत आहे ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करा,असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकार ला सातत्याने सांगत आहेत मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात काहीच हालचाली केल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्या असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मुखेड कंधार मतदार संघाचे आमदार डॉ तुशार राठोड यांच्यासह महाराष्ट्र ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष माधव आण्णा साठे, डॉ माधवराव पाटील उच्चेकर,सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, डॉ.विरभद्र हिमगीरे, अशोक गजलवाड,माधव राठोड, नगरसेवक चंद्रकांत गरूडकर,राजु बामणे,नासार पठाण, जगदीश बियाणी,गौतम काळे,दिपक मुक्कावार,प्रा.वानोध आडेपवार,राम पाटील गायकवाड, सौ.राजश्रीताई राठोड, किशोरसिंह चौहान, पोर्णिमा बेटमोगरेकर,भागश्री पवार,शंकर नागरगोजे,राजीव मुंडे ,मारोती कागणे,माधव कागणे मा पाटील हिब्बटकर, बाबुराव कागणे मा सरपंच हिब्बटकर यांच्या सह शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडनुका होनार नाहीत असे वारंवार सागणारे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी काहीच हालचाल केली नाही, ओबीसी समाजाच्या पाटित खंजीर खूपसणाऱ्या आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तर्फे निषेध करण्यात येत असुन ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी योग्य ती पाउले त्वरित उचलावित अन्यथा आगामी काळात भाजपा तर्फे उग्र आंदोलन करु. असा इशारा आ.डॉ.तुशार राठोड ,मुखेड कंधार मतदारसंघ यांच्यातर्फे देण्यात आला.