वेतन संहिता मसुदा नियम, २०२१ बाबत ४५ दिवसात सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन.

मुंबई, दि. २२ : केंद्र शासनाने २९ कामगार कायद्यातील तरतूदी एकत्रित करुन ४ कामगार संहिता पारित केलेल्या आहेत. विविध कामगार कायद्यातील बदल हा जवळपास ४० वर्षांनी होत आहे.

  1. वेतन संहिता (एकूण ४ अधिनियम)
  2. औद्योगिक संबंध संहिता (एकूण ५ अधिनियम)
  3. सामाजिक सुरक्षा संहिता (एकूण ९ अधिनियम)
  4. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता (एकूण १३ अधिनियम)

केंद्र शासनाने ८ ऑगस्ट २०२० रोजी पारित केलेल्या वेतन संहिता अधिनियम, २०१९ च्या कलम ६७ अनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये वेतन संहिता नियम,  २०२०, ७ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने, राज्यातील कामगारांना वेतन संहितेच्या तरतूदी कशाप्रकारे लागू होतील यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या वेतन संहितच्या अुनसार महाराष्ट्र राज्यात लागू करावयाच्या नियमांचा प्रारुप मसुदा विभागाने अंतिम केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या वेतन संहिता नियम, २०२० च्या कलम ६७ अनुसार राज्यात लागू करावयाच्या वेतन संहिता मसुदा नियमांचे प्रारुप दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या राजपत्रात (www.dgps.maharashtra.gov.in ) आणि शासकीय संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in ) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या कामगार संघटना, कामगार वर्ग, मालक आणि विविध सामाजिक घटकांकडून राज्यात लागू करावयाच्या वेतन संहिता मसुदा नियम, २०२१ बाबत सूचना आणि  हरकती कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, ब्रांदा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ यांचेकडे व्यक्तीश:, पत्राद्वारे अथवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलद्वारे मागविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *