नवी दिल्ली, १९ : नवी दिल्ली जिल्हयाच्या छावनी भागाचे उपविभागीय दंडाधिकारी पियुष रोहणकर यांची काल महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी सदिच्छा भेट घेतली
येथील जामनगर हाऊस मध्ये श्रीमती अरोरा यांनी श्री रोहणकर यांची भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यालयाची परिचय पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ अंकही भेट दिले. यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती दिली तसेच श्री राहेणकर यांनी प्रशासकीय सेवेत राबविलेल्या वैविद्यपूर्ण उपक्रमांची व प्रकल्पांची माहिती दिली.
श्री रोहणकर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१४ तुकडीचे (दानिक्स) अधिकारी असून ते उत्तम लेखकही आहेत. त्यांची एकूण तीन कविता संग्रह आणि दोन स्पुट संग्रह प्रकाशित आहेत. श्री रोहणकर यांनी ‘एक IAS Aspirant की रोमांचक सक्सेस स्टोरी’ आणि ‘A Pleasant Escape’ ही स्वलिखित पुस्तके श्रीमती अरोरा यांच्याकडे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयासाठी भेट स्वरूपात दिले.