‘ईद-ए-मिलाद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १९ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ‘ईद ए मिलाद’ निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला  ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या मानवतावादी कार्याचे तसेच परोपकाराच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *