कुंडलवाडीत आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांची सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

कुंडलवाडी प्रतिनिधी –रुपेश साठे,दि.१९ आॅकटोंबर
    कुंडलवाडी शहरातील बाजार मैदानात भारतीय जनता पक्षाचे विधानसभा  पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार सुभाषराव साबणे यांच्या  प्रचारार्थ आज दि.१९ ऑक्टोंबर रोज मंगळवारी मुख्य बाजार मैदानात सिनेमा टाकीजसमोर सकाळी  ठिक ११:०० वाजता भारतीय जनता पार्टीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
आयोजित सभेस भारतीय जनता पक्षाचे डाॅ.भागवतजी कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री,जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,उमेदवार सुभाषराव साबणे आदीसह मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.तरी या सभेस कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  कुंडलवाडी न.प.चे माजी उपनगराध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार व भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष शेख जावेद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *