मुखेड प्रतिनिधी :ज्ञानेश्वर कागणे,दि : १९ :
मुखेड येथील मौजे हिब्बट ता मुखेड हद्दीतील मंडलापुर फाटा ते कोळगाव फाटा १३०० मीटर रोड मागील दोन महिन्यापुर्वी गिरी कन्ट्रक्शन नांदेड यांनी केला असुन त़ो रोड सप्टेंबर मधील अतिवृष्टी मघे उखडून गेला आहे
मौजे हिब्बट व कोळगाव येथील नागरिकांना दळणवळण व मेडिकल सेवा सुविधा साठी जवळचा असुन तो रस्ता मात्र दोन महीन्यातच उघडून गेला असल्याने नागरिकां मध्ये गुत्तेदार व आधिकारी यांच्या संगणमताने हा भ्रष्टाचार केला गेला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे त्याच अनुषंगाने हिब्बट चे सरपंच सौ शिवकन्या राजिव केंद्रे यांचे प्रतिनिधी श्री राजिव केंद्रे यांनी मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे योग्य ती कार्यवाही करुन प्रशासनास सुचना देउन नवीन रोड करुन देन्याची मागणी केली आहे व मागणी मान्य न झाल्यास लोकशाही च्या मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.