दि : २० देगलूर विशेष प्रतिनिधी , गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून सुद्धा वारंवार पक्षश्रेष्ठी तर्फे डावलण्यात आलेले अरुण कोंडीबाराव दापकेकर. (गायकवाड) रा.औरंगाबाद, मुळगाव ( राजा दापका). हे मातंग समाजाचे सक्रिय कार्यकर्ते असून १९८२ पासून काँग्रेस पक्ष संघटनेत विविध पदावर कार्य केलेले आहेत. विधानसभेसाठी आमदारकीची यांची वारंवार पक्षाकडे मागणी होती, जी नेहमी पक्षश्रेष्ठींकडून डावलण्यात येत होती.
२००९ च्या लोकसभेच्या उमेदवारासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली असता मातंग समाजाचे उमेदवार म्हणून पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली पण ऐन वेळी त्यांची उमेदवारी रद्द करून शेवटच्या क्षणी इचलकरंजी येथील माननीय जयंतरावजी आवळे यांना उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला तरीदेखील त्यांनी पुढील आशा करीत पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करीत होते पण आता देगलूर बिलोली पोट निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असता ही उमेदवारी जितेश रावसाहेब अंतापूरकर माजी आमदार यांचे चिरंजीव यांना देण्यात आली. त्यामुळे पक्षश्रेष्ठी वारंवार जाणून बुजून मला डावलत आहे म्हणून मी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उभे राहात असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.
सेवाभावी संस्थेच्या कामानिमित्त त्यांचा राज्यभरात जनसंपर्क आहे. पक्ष संघटनेच्या विविध पदावर, व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध विकास कामे त्यांनी केलेली आहेत त्यांचे वडील प्राध्यापक के.आर. गायकवाड (दापकेकर) हे नांदेड जिल्ह्यात बोधडी येथे आदिवासी भागात प्राथमिक शिक्षक होते नोकरी करत असताना ते मराठवाडा विद्यापीठातून इतिहास विषयात प्रथम क्रमांकाने पास झाल्याने माननीय.नामदार. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांनी त्यांना औरंगाबाद येथे इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली होती मुखेड मतदार संघातून त्यांनीदेखील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली असता तुम्ही नोकरी करत असताना तुम्हाला उमेदवारी देणे शक्य नाही असे म्हणून त्यांना डावलले होते. या गोष्टीची देखील खंत यावेळी त्यांनी मांडली अरुण दापकेकर हे पुणे येथे बॅचलर ऑफ जर्नालिझम शिक्षण घेऊन सेवाभावी संस्थे अंतर्गत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांचे वडिलांना राज्य दुय्यम सेवा निवड मंडळ औरंगाबाद, तसेच रेल्वे भरती बोर्ड पश्चिम व मध्य रेल्वे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महासंघ संचालक असे पद देऊन त्यांना सन्मान करण्यात आला होता त्याबद्दल त्यांनी शरद पवार यांचे ऋण व्यक्त केले व आभार व्यक्त केले एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर व वारंवार काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी आता बंड पुकारला असून यावेळी देगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये ते अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत ते जरी अपक्ष उमेदवार असले तरी त्यांचे ध्येय व अजेंडा नक्कीच बरोबर आहे अशी देखील चर्चा आता गावागावातून होत आहे इतक्या वर्षाच्या राजकीय अनुभवाचे व प्रकल्प संस्थाचालक म्हणून राज्यभरात त्यांचा जनसंपर्क पाहता देगलूर बिलोली विधानसभेमध्ये मला मतदार राजा नक्की निवडून देईल असा मला आत्मविश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले. माझे निवडणूक चिन्ह बकेट असून बकेट का समोरचे बटन दाबून मला विजयी करा, नक्कीच मी विकासाचे पाणी तुमच्या तालुक्यात भरभरून देईन असेही यावेळी ते म्हणाले.