सुभाष साबणे स्वतःहून पक्ष सोडले नाहीतर, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी पक्ष सोडले –केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड.

कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे दि.२० :
सुभाष साबणे स्वतःहून पक्ष सोडले नाहीतर,त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी पक्ष सोडले कारण शिवसेनेने कांग्रेस बरोबर युती केली,कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली आणि एक गरीब कार्यकर्ता जिंदा उमेदवारला उमेदवारी दिली नाही त्यांच्यावर अन्याय केला,आपल्यावर अन्याय झाला म्हणून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुभाष साबणे भाजप मध्ये आले आणि भाजप मधून त्यांना उमेदवारी दिले.असे केद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केली. दि.१९ ऑक्टोंबर रोज मंगळवारी कुंडलवाडी येथे भाजप मित्र पक्ष युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचार सभेत अध्यक्षीय भाषणात असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा ना भागवत कराड हे होते तर, प्रमुख पाहुने म्हणून गणेश हक्के महाराष्ट्र राज्य भाजप प्रवक्ता,डॉ.अजित गोपछेडे म. प्र. अ. डॉ. सेल, राजेश पवार आमदार,सौ.पुनमताई पवार,लक्ष्मण ठक्करवाड,रवी आण्णा पोदगंटीवर,मारोती वाघ,व्यंकटराव साठे,श्रीनिवास पाटील नरवाडे,संगीताताई मेरगेवार,माणिक लोहगावे,राजेंद्र रेड्डी,डॉ विठ्ठल कुडमुलवार,यादवराव तुडमे,अनिल ढगे,रोहित साबणे,सुलोचनाताई स्वामी,जयश्री देशमुख यासह आदी मान्यवर व्यासपीठारवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.कराड म्हणाले की,मी आपल्या समोर मा.नरेंद्र मोदी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे.मा.नरेंद्र मोदीनी देशातुन ७७ लोकांना निवडले आणि मराठवाड्यातून मला निवडले आहे.मोदी साहेबांनी देशात अनेक योजना आणले आहेत.१३० कोटीच्या देशात बँकेत फक्त १४ कोटी लोकांचे खाते होते तर मोदी साहेबांनी जनधन योजनेच्या माध्यमातुन गोरगरिब लोकांचे ४५ कोटी जनधन खाते काढले आहे.
महाराष्ट्र राज्यातल्या जनतेने भाजप सेनेच्या युतीच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या पण भारतीय जनता पक्षाच्या नावावर निवडुन येऊन शिवसेनेने जनतेसह भाजपाचा विश्वासघात केले आहे.दोन वर्षात कुठलेच विकासकामे झाले नाहीत.काँग्रेस पक्षाने जे ७० वर्षात विकासाचे काम केले नाहीत. ते मोदी सरकार सात वर्षात करून दाखवले आहे.शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत जाऊन महा विकास आघाडी तयार केली आहे. माजी आमदार सुभाष साबणेला भाजपाने उमेदवारी आहे. कारण त्यांना पंधरा वर्षाचा आमदारकीचा अनुभव आहे.तर दुसरी कडील उमेदवाराला ना पंचायत समितीचा ज्ञान आहे ना जिल्हा परिषदचा ज्ञान आहे,आमदारकीचे तर दूरच राहिले,हा उमेदवार जर निवडून आला तर सर्व काही अशोकराव चव्हाणांच्या हातात राहिल यामूळे मतदार संघाचा विकास खुंटतो म्हणून तुम्हाला विनंती करायला मी आलो आहे. सुभाष साबणेला बहुमताने निवडून आणा  पंढरपुर प्रमाणे राज्यात चमत्कार घडवा असे आवाहान येथील मतदार बांधवांना केले आहे.
याप्रसंगी पत्रकार राजू पाटील शिंपाळकर,संदीप बिलोलीकर,रुपेश साठे,संतोष मेहरकर,सय्यराम धात्रक,अनिल धात्रक,वडोजी भोरे,सुरेश भास्कर,लिंगुराम गंगोने,पोतोजी करपे आदींनी डॉ.भागवत कराडच्या उपस्थित जाहीर प्रवेश केले आहे.
यावेळी वंजारी समाज बांधवांच्या वतीने डॉ.भागवत कराड यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी व्यंकट सरोदे,श्याम माहेवार,संतोष करपे,यासह वंजारी समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी शंकर मावलगे,जावेद शेख,दत्तू कापकर,नगरसेवक अशोक पाटील खुळगे,गंगाप्रसाद गंगोणे,पंढरी पुप्पलवार,पंढरीनाथ दाचावार,श्रीनिवास नारावाड, हणमंलू कोनेरवार,शेख वहाब,लक्षुमन भंडारे,राजू माहेवार,राजेश दुप्तले,शिवकुमार गंगोने,बक्क्या,यासह आदी भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार बांधव,मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संतोष पाटील शिवशेट्टे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *