मदनूर पोलिसांनी शकर्गा (एस) शिवारात एक बेवारस मृतदेह बाहेर काढला. . कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळाच्या शकर्गा (एस) शिवारात, काल संध्याकाळी मदनूर पोलिसांकडून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि घटनेची माहिती घेतली तेथे गेल्यानंतर या बेवारस तरुणाची हत्या केली गेली असल्याचे चित्र दिसून येत होते मृताच्या अंगावर पेट्रोल शिंपडले. चेहरा आणि छातीचा अर्धा भाग पेटवण्यात आला होता . मृताची अद्याप ओळख पटलेली नाही या प्रसंगी मदनूर एस.आय. राजू यांनी पोलीस गुन्हा नोंदवला आणि त्यांनी बिचकुंदा सी. आय.ला हत्येची माहिती घेतल्याची कळवले तात्काळ सी.आय.घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती घेवुन, श्वान पथक आणि फिंगर प्रिंट्स घेतले. यावेळी मदनुर देसाई राजू यांनी सांगितले की अद्याप पर्यंत मृताची ओळख पटलेली नाही पुढील तपास चालू आहे.