नवी दिल्ली, २१ : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.