मुखेड तालुका प्रतिनिधी. ज्ञानेश्वर कागणे, दि.०६
मुखेड तालुक्यातील मौजे हिब्बट येथे दिपावली निमित्त हिब्बट येथील गावकरी, राष्ट्रपीता म. जोतिबा फुले सेवाभावी संस्था जवानांनी गावामधे सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले
तर प्रथम सत्रात राष्ट्रपिता म.जोतिबा फुले सेवाभावी संस्था हिब्बट यांच्या तर्फे लाल कंधारी गाय व वळुचे शिबीर व विर सैनिक ग्रुप तर्फे १६०० मिटर लांबीच्या धावन्याची स्पर्धा घेतली
तर दुसऱ्या सत्रात गावातील गुनवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत नव्याने रुजु झालेल्या कर्मचारी व शिबिरातील व स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना बक्षिसे व सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हास्ते करन्यात आला तर प्रोत्साहन पर बक्षिसे स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना देण्यात आली
गुनवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला दहावी मध्ये ९८.६० मार्क घेऊन कु श्रावणी रमेश घुमलवाड तर ९५.२० मार्क घेऊन मुंडे शंकर बाबुराव आणी मेडिकल निट परिक्षेत कु संजीवनी त्र्यंबक केंद्रे ५८८ तर कु भाग्यश्री बालाजी मुंडे ५४२ व चि दत्ता बालाजी मुंडे ५०३ मार्क घेऊन पात्र झाले असुन त्यांच्या सत्कार करन्यात आला तसेच विर सैनिक ग्रुप तर्फे स्पर्धेत निवड झालेल्या व स्पर्धेत भाग घेतलेल्या नव तरूणांना बक्षिसे व व्यायाम उपयोग साहित्य देन्यात आले व गावातील भितीवरती प्राथमिक शैक्षणिक माहिती पेंटिंग करण्यात आली
तर तिसऱ्या सत्रात गावकऱ्यांनी दिपावलीच्या निमित्ताने भारुडे व किर्तनाचा कार्यक्रम साजरा केला
या प्रसंगी श्री माधव आण्णा साठे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ओबिसी मोर्चा,श्री रावसाहेब रॉपनवाड भाजपा सरचिटणीस मुखेड, अँड गोविंद कागणे सचिव राष्ट्रपीता म.जोतिबा फुले सेवाभावी संस्था हिब्बट, श्री लक्ष्मणराव केद्रे ए पि आय,राजीव केंद्रे सरपंच, नारायण नागरगोजे मा सरपंच, बाबु भुजंगराव कागणे गुरूजी, दशरथ गायकवाड, हाणमंत गायकवाड गुरुजी,आपले सरकार सेवा केंद्र चालक अर्जुनराव कागणे सर्व शेतकरी, गावातील सर्व नागरिक उपस्थित होते