“एक दिवाळी अशीही..” इन्साफचा कौतुकास्पद उपक्रम.

 

बेघरांची दिवाळी केली गोड.

देगलूर/प्रतिनिधी दि.०५

एकीकडे अत्यंत उत्साहात नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी होत असताना समाजात असेही लोक आहेत जिथे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी संघर्ष हा ठरलेलाच आहे. तीन वेळच्या पोटभर जेवणाच्या समस्या अंगावरच्या कपड्यांचे समस्या अशा परिस्थितीत मग दिवाळी ही अशा लोकांसाठी कल्पनेतलीच गोष्टी अशाच गोरं गरिबी कुटुंबातील मुलांना “एक दिवाळी अशीही” उपक्रमाअंतर्गत ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ देगलूर च्या वतीने दि. ०५ रोजी शहरातील गॅस गोदाम च्या पाठीमागील व तसेच उदगीर रोड वर पाली घालून वसलेल्या कुटुंबातील मुलांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळची भेट देत या कुटुंबांचे जिव्ह्याळ्याचे प्रेम तर मिळाला तसेच बेघरांची दिवाळी थोडीफार का होईना आंनदाच्या रुपाने प्रकाशमय झाली असल्याचे पाहावयास मिळाले.
या दिवाळी भेटवस्तुमुळे त्या कुटूंबाच्य्या चेहर्‍यावर हास्य फुलले हे विशेष.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या घरात दिमाखात दिवाळी साजरी करत असताना समाजभान जपून अशा वंचितांना मदत करत त्यांचीही दिवाळी गोड करणारी माणसे आपल्यात आहेत.
देगलूर मधील इन्साफ ही संघटना अनेक महामानव यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. सोबतच या संघटनेने देगलूर पोलिस स्टेशन मध्ये वृक्षरोपन करुन वृक्षसंवर्धन चा चांगला संदेश या माध्यमातून दिला या सोबतच रक्तदानाचे अनेक शिबिरे घेऊन अनेकांना जिवनदान ही दिले.
दरम्यान या दिवाळी निमित्त ही गोरं गरिबांची दिवाळी गोड हवाली या साठी ही इन्साने सदरील उपक्रम राबवून देगलूर करांच्या कौतुक पात्र ठरले आहे.

हा अभिनव उपक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष शेख असलम, शहराध्यक्ष नाजीम शहा, तालुका प्रवक्ता मिलिंद वाघमारे, शहर कार्याध्यक्ष शेख इम्रान, शहर सचिव सुजित सुर्यवंशी, शहर संघटक इलियास बागवान, शहर उपाध्यक्ष हमीद शहापूरकर, विशाल पवार, साईनाथ कावटवार, शेख इम्रान आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *