शिवसेना, राष्ट्रवादी, व घटक पक्षाला चिंतन करण्याची गरज.
देगलूर प्रतिनिधी दि.०५ : नुकत्याच झालेल्या देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध बीजेपी म्हणजेच बीजेपी विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ,व इतर असा संघर्ष देगलूर मध्ये पाहायला दिसला. शिवसेनेचे सुभाष साबणे हे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करीत होते, ते सेनेमध्ये कार्यकर्त्या पासून मोठे होऊन तीन वेळा आमदार झाले मराठवाडा प्रतोद म्हणुन मिरवले पण यावेळी महाविकास आघाडी मुळे त्यांना सेनेकडून संधी मिळणार नाही म्हणून त्यांनी बंड केला. व भाजपमध्ये प्रवेश केला भाजपा मध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असताना शिवसेनेची काँग्रेस पक्षात युती असल्यामुळे शिवसेनेला साबणे यांच्या खुलून विरोध करावा लागला. खरेतर शिवसेनेमुळेच साबणे यांची हार या निवडणुकीत निश्चित झाली असे पण जाणकारांचे म्हणणे आहे, काही जण तर असे ही चर्चा करताना दिसून येतात की या पोटनिवडणुकीचा किंगमेकर शिवसेनाच आहे असे जरी असले तरी राष्ट्रवादी पण यावेळी मागे राहिली नाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पण यावेळी काँग्रेस पक्षाला भरभरून साथ दिली अन्यथा मागील इतिहास पाहता काँग्रेस राष्ट्रवादीची युती असताना देखील काँग्रेस पक्ष्याला जर जागा सुटली तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहिजे तेवढ्या उत्साहात सहभागी होत नसत त्याचे कारण म्हणजे त्यांना वाटत असे, की आम्ही जर उत्साहाने काम केले तर पुढे आम्हाला काँग्रेस पुढे किंमत राहणार नाही पण यावेळी शिवसेनाच द्वेष भावनेमुळे फ्रंट मध्ये असल्यामुळे नाईलाजास्तव का होईना पण पूर्वीपासून युती असल्यामुळे राष्ट्रवादीला देखील पुढे यावे लागले व या दोघांच्या जोरामुळे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे निवडून आले आहेत हे तितकेच सत्य आहे.
कारण कोणतेही असो पण या निवडणुकीमुळे महाविकासआघाडी मुळे जरी ही निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली असली तरी याचा फायदा पुढच्या काळात फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षालाच होताना दिसत आहे आणि नुकसान मात्र शिवसेना राष्ट्रवादी पक्षाला होईल.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री ,नांदेड जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा ,व इतर काँग्रेस मधील नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते .या निवडणुकीत देगलूर मध्ये तळ ठोकून होते त्यामुळे जास्तीत जास्त वेळ ते निवडणुकीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये देत होते महाविकास आघाडीमुळे सेना ,व काँग्रेसमधील कार्यकर्ते एकत्र आले. जे की मागील तीस ते चाळीस वर्षापासून कधीच एकत्र आले नव्हते. त्यांची विचारधारा वेगळी असल्यामुळे ते जवळ असून देखील कधी एकत्र येत नव्हते. देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने व महाविकास आघाडीमुळे एका गावातील ,एका शहरातील ,एका तालुक्यातील ,एका जिल्ह्यातील दोन विविध पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे त्यांच्यातील वाद व विचारसरणी बदलून आपापसातील मतभेद ,व वैमनस्य संपवुन एकत्र काम करून त्यांच्यामध्ये जवळपास मित्रत्वा सारखे नाते तयार झाल्याचे दिसत आहे.
अगदी सेनेचा व राष्ट्रवादीचा सच्चा व कट्टर कार्यकर्ता देखील या पोटनिवडणुकीत अशोकरावांच्या सानिध्यात व जवळ गेल्यामुळे कार्यकर्त्याची विचारसरणी बदलून येणाऱ्या काळात ते काँग्रेसकडे वळण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत .जशी स्वार्थापोटी सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये उडी टाकली ,तशी आगामी काळात नगर परिषद व, जिल्हा परिषद मध्ये सेना ,राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.