प्रशासनाला लक्ष घालण्याची गरज.
देगलूर प्रतिनिधी, १६ /२०२१ : कोरोना महामारी मध्ये केंद्र सरकारने लाॅक डाऊन घोषित केल्यानंतर जसा अनलॉक सुरू केला, त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या रोज मर्राचया आणि गरजेच्या वस्तू विक्रीसाठी फक्त काही व्यापाऱ्यांनाच दुकान उघडण्याची परवानगी व व्यापार करण्याची परवानगी होती जसे दूध, भाजीपाला, किराणा,भाजी पाला, इत्यादी तेही मर्यादा लावूनच काही तासांपुरती ग्राहकांना नागरिकांना खरेदी करण्याची मुभा होती . त्यामुळे ग्राहकांची संख्या जास्त होती व दुकानदारांची संख्या कमी होती . याचाच फायदा घेत काही लालची व्यापाऱ्यांनी संधी साधून आपले उखळ पांढरे करण्यासाठी नफेखोरी करण्यास सुरुवात केली व अवाच्या सव्वा भाव लावून चढ्या भावाने माल विक्री सुरू ठेवली , पण वेळेची कमतरता व परिस्थिती पाहता ग्राहकाने या गोष्टीला विरोध न करता माल खरेदी सुरू ठेवली त्यानंतर हळूहळू बाजारपेठ फुलू लागल्या व सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठाने प्रतिष्ठान सुरू होऊ लागल्यानंतर ही नफेखोरी कमी होऊ लागली . कारण काही व्यापारी प्रामाणिकपणे व्यापार करतात तर काही स्पर्धा त्यामुळे नफेखोरी चे प्रमाण काही अंशी कमी झाले. पण बंद झाले नाही, याउलट आज घडी तर असे चित्र आहे की काही क्षेत्रात जसे कापड, भांडी, मेडिकल, किराणा, व भाजीपाला इत्यादी क्षेत्रात दाम दुप्पट तर काही जण व्यापारी नफ्याचे प्रमाण चार पटीने व त्यापेक्षाही जास्त ठेवून ग्राहकास वेठीस आणताहेत सर्वच क्षेत्रातील व्यापारी संघटित असल्यामुळे एकाचे पाहून एक व्यापारी याच तत्त्वावर काम करीत आहेत.
काही व्यापाऱ्याकडे नफेखोरी बद्दल विचारणा केली असता आम्हाला अव्वाच्या सव्वा दुकान भाडे आकारले जाते ते दुकानाचे भाडे आम्ही कोठून काढायचे आम्ही त्यामुळे आम्हाला जास्तीच्या भावाने माल विक्री असा व्यापार करावा लागतो असे उत्तर देत आहेत.
कारण काहीही असो पण या गोष्टीला काही तत्त्वाचा आधार नाही गाळे मालक किंवा दुकान मालक (घर मालक) यांनी पण जादाचे भाडेवाढ करू नये .व “व्यापार्यांना वेठीस धरू नये ” कारण त्याचा परिणाम ग्राहकावर होतो व सर्व सामान्य जनतेला व नागरिकांना याचा भुर्दंड सोसावा लागतो आणि व्यापाऱ्यांनीही त्याच जागेसाठी त्याच्यासाठी हट्ट करून मालकाला प्रोत्साहन न देता कायद्याच्या बाजूने जाऊन विचार करावा, यासाठी वेगळा कायदा पण आहेच की याबाबतीत व्यापारी हीबाब प्रशासनाच्या निदर्शनास पन आणून देऊ शकतात . पण व्यापारी असे न करता गाळे मालकाला मनाप्रमाणे जादा चे भाडे देऊन त्या बदल्यात ग्राहकांची लुट करावी हे देखील चुकीचे आहे.
या बातमीच्या माध्यमातून आम्ही केवळ व्यापारी, किंवा गाळेधारक यांनाच नव्हे तर कायदा व सुव्यवस्था यांना देखील तितकेच जबाबदार समजून , असे आवाहन करतो की प्रशासन या गोष्टीकडे लक्ष घालून गाळे मालक (घर मालक )यांच्या भाडे आकारणी वर अंकुश ठेवून तसेच जाणून-बुजून नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून ग्राहकांना तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा.