हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि, १८: हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त काल दि.१७ /११ रोजी विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार  अर्पण करून अभिवादन केले.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ वा स्मृतीदिन विधान भवन येथे पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक असे त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान होते. शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री दिवाकर रावते, नाना पटोले, अशोक पवार, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, सरोज अहिरे,  विक्रम काळे, कपिल पाटील, अमित झनक, सुधीर तांबे, महादेव जानकर, राजेश राठोड, प्रकाश फातरपेकर, श्रीमती यामिनी जाधव, श्रीमती मनिषा कायंदे, निर्मला गावित, श्रीमती सुमनताई पाटील, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, सुनिल झोरे, पुनम ढगे, सायली कांबळे यांनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *