मुंबई, दि. ०१ डिसेंबर : तैवान येथील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक, राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात डॉ. मुमीन चेन, पीटर चेन, डॉ. चिन्स्टन वँग, जेन चुन टैसाई, इ टी चॅँग आदी उपस्थित होते. तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर इन इंडिया’च्यावतीने या बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते.
भारत आणि तैवान दरम्यान अनेक वर्षांपासूनचे सौहर्दाचे संबंध आहेत. अनेक क्षेत्रात दोन्ही देश हातात हात घालून काम करीत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यास मुबलक संधी आहे. गुंतवणुकदारांसाठी उद्योग विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तैवानने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणुक वाढवावी. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती, तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.