जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून हदगाव येथे दिव्यांगाकरीता लसीकरणाचेआयोजन.

हदगाव प्रतिनिधी, दि.०४ डिसेंबर. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ३.१२.२०२१ रोजी सम्राट अशोक निवासी मतिमंद विद्यालय, साईबाबा निवासी अस्थीव्यंग विद्यालय, निवासी मूक बधिर विद्यालय, हदगांव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय हदगाव तसेच तहसील कार्यालयाचे तहसीलदार जीवराज डापकर साहेब ऊपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील शासकीय.रुग्णालयाचे आधिक्षक ढगे साहेब, दिव्यांग विकास समीती संघटनेचे समीर पटेल महाराष्ट्र ग्रंथालय संघटनेचे कुबेर राठोड, दिव्यांग शाळेतील सर्वच कर्मचारी व १००-१५० च्या संखेत जमलेले दिव्यांग बांधव ह्यांच्या ऊपस्थीतीत ग्रामीण रुग्णालय हदगांव ता.हदगांव येथे जागतीक दिव्यांग दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे सुञसचंलन वट्टमवार, व प्रास्तविक मतिमंद विद्यालयाचे गजानन मोरे यानी केले.

आगरकर सुदेश यांनी योजना लसीकरण व कायदे दिव्यांगबद्दल जणजागरण ईत्यादी माहीती दिली. दिव्यांग संघटना समीर पटेल यानी मतिमंद व मुकबधिर ह्या प्रवर्गाचे प्रमाणपञ देणे सुरु करण्याची मागणी केली. कार्यक्रमाचा समारोप अधिक्षक ढगे साहेब यानी केले रुग्णालयात दिव्यांगांना कुठलाही त्रास होणार नाही व दिव्यांगांना रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही आरोग्य सेवक आरोग्य कर्मचारी व आम्ही डॉक्टर सदैव दिव्यांगाच्या मदतीला धावून येईल असे आश्‍वासन ढगे साहेब यांनी दिले व दिव्यांगाना कुठलेही वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ञास होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली दिव्यांगाला सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सदरील कार्यक्रमास डाॕ.पोटे,डाॕ,स्वामी,डाॕ, गंगासागर डाॕ.तोगरे, पचायत समीती दिव्यांग विभाग प्रमुख माधव आवळे व फोटोग्राफी साठी वेळोवेळी मदत करणारे आशोक चाभरेकर, सजय तावडे, शीवाजी पाळेकर, शिवकुमार कास्टे, धारेश्वर डाके,संजिव ऊडांळ,तानाजी ईबीतवार, संजय बोधणे,बालाजी वाघमारे,खाकरे,भास्कर देवसरकर,सुदेश आगरकर हे आवर्जुन ऊपस्थीत होते…सदरील कार्यक्रमात दिव्यांगाकरीता लसीकरण करुन घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *