नका चढवु फुले – हार त्याहून श्रेष्ठ एक वही एक पेन उपहार.
देगलूर (प्रतिनिधी,दि. ०८ डिसेंबर : ज्ञानसूर्य, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या तीन वर्षापासून एक वही, एक पेन अर्पण करून आगळावेगळा अभिवादनाच्या उपक्रमास याहीवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या अभियाना प्रसंगी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार तर प्रमुख पाहुणे आ.जितेश अंतापूरकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेशटवार, रा. कॉ. प्रदेश सरचिटणीस रमेश देशमुख शिळवणीकर तसेच राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष अॅड. अंकूश देसाई देगावकर, शिवसेनेचे महेश पाटील, प्रा. उत्तम कुमार कांबळे, वंचितचे डॉ. उत्तम इंगोले पो.नि. अरूण माच्छरे, पो.उ.नि. गडीमे , रमेश सोनकांबळे शिवणीकर, डॉ. मिलिंद शिकार, डॉ. महेश शेटलवार यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपस्थितांच्या हस्ते बुद्ध वंदना आणि संघ वंदना घेऊन वंदन करण्यात आले. नका चढवु फुले-हार त्याहून श्रेष्ठ एक यही एक पेन उपहार या उक्तीप्रमाणे संयोजक विकास नरबागे यांनी गेल्या तीन वर्षांपासून हा अभियान देगलूर शहरात राबविला आहे. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी संयोजक विकास नरबागे यांना वही आणि पेन दिले व उपस्थित मान्यवरांच्या हस्तेच गरजू शालेय, गरीब होतकरू विद्याथ्र्यांना एक वही व एक पेन वाटप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशा सामाजीक उपक्रम राबविल्याने मान्यवरांनी संयोजकाचे कौतुक केले व अशा अभियानामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड व प्रेरणा मिळत राहील असेच लोकोपयोगी उपक्रमाचा आदर्श घ्यावा असे ही मान्यवरांनी अवाहन केले होते. यावेळी शहरातील सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरीक, विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.