मुखेड प्रतिनिधी- ज्ञानेश्वर कागणे
मुखेड (दि १२) : मौजे हिब्बट तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे स्वर्गीय लोकनेते बहुजन कैवारी मा.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती हिब्बट येथे मोठ्या थाटामाटात श्री संत भगवान बाबा संघटना व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
व तसेच जयंतीनिमित्त श्री संत भगवान बाबा संघटना व गावकरी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आयोजनामध्ये सकाळी गावातील रस्त्यावर रांगोळी काढुन ठीक नऊ वाजता राष्ट्रसंत भगवान बाबा लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केले दुपारी प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी सुप्रसिद्ध व्याख्याते श्री अविनाशजी भारती यांचे सायंकाळी व्याख्यान आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास गावातील सर्व अधिकारी पदाधिकारी व श्री संत भगवानबाबा संघटनेचे सर्व कार्यकर्ते गावातील नागरिक आवर्जून उपस्थित होते.