मुंबई, दि. २५ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. खुशपत जैन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील मराठी यशाचा टक्का वाढत आहे. यंदाही अनेक विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे शासनाची ध्येयधोरणे तसेच राज्यातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचाही मोलाचा वाटा आहे. या संस्थांपैकी मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था नागरी सेवा परीक्षेसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेची आतापर्यंतची वाटचाल आणि नागरी सेवा परीक्षेतील महाराष्ट्राचा उंचावत असलेला आलेख याविषयीची माहिती डॉ. जैन यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.