मुखेड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर कागणे,दि : १०
श्री साईनाथ ग्रामीण महिला बचत गट यांच्या वतीने मौजे हिब्बट येथे कोरोना महामारीवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात कोरोना महामारी वर घ्यावयाची काळजी खबरदारी कशाप्रकारे घ्यावी याची माहिती देण्यात आली खबरदारी म्हणून मास्क घालणे सोशल डिस्टंसिंग मेंटेन करणे किंवा सामाजिक अंतराचे भान ठेवणे वेळोवेळी हात स्वच्छ करणे चेहरा स्वच्छ करणे सॅनिटायझर चा वापर करणे त्याच सोबत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम व कसरत करणे याची माहिती देण्यात आली.
त्यावेळी श्री साईनाथ ग्रामीण महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ राधाबाई अर्जुनराव कागणे सचिव सौ कालींदा संजय कागणे व सर्व सदस्य व गावातील सर्व महिला बचत गट प्रतिनिधी व समूह प्रतिनिधी व सि आर पी प्रतिनिधी उपस्थित होते व प्रथम पाहुणे म्हणून सरपंच,पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व हे होते तर या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स कु. कोमल बरांडे व त्यांच्या टीम कडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे माहिती बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांनी दिली.