औरंगाबाद प्रतिनिधी, दिनांक २८ : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज वेरूळ लेण्यांच्या समोरील वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण केले.
उपवन सरंक्षक अंतर्गत वन परीक्षेत्र खुलताबादच्या वेरूळ उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी वेरूळ पर्यटन केंद्र, कैलास लेणी व परिसरासह शहाजी महाराज भोसले स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब, चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.