‘दिलखुलास’ कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुलाखत

शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखत

मुंबईदि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनबहुजन कल्याण तसेच खार जमीन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवार दि.२८ जानेवारीशनिवार दि. २९ जानेवारी व सोमवार दि.३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोविड सारखे अचानक आलेले संकट तसेच अचानक आलेली चक्रीवादळेमोठ्या प्रमाणात  झालेली अतिवृष्टीपूर कालावधीत झालेली मोठ्या प्रमाणातील जिवित व वित्तहानी अशा अनेक संकटांचा सामना करीत असताना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व त्यांची अंमलबजावणीइतर मागासवर्ग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी घेतलेले निर्णय आदि विषयांची सविस्तर माहितीमंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांनी दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *