मुंबई दि. ०८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून मंगळवार दि. ८ फेब्रुवारी आणि बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात झालेली वाढ, त्याची कारणे आणि अशा घटना रोखण्यासाठी वन विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, व्याघ्र व त्यांचे व्यवस्थापन, संवर्धन, राज्यात गेल्या दोन वर्षात नव्याने घोषित करण्यात आलेले संवर्धन राखीव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी अभयारण्य यांचे व्यवस्थापन, कोकणात वनविभागातर्फे एका ठिकाणी कासवाच्या पाठीवर बसवण्यात आलेले रेडिओ कॉलर अशा सर्व निर्णयांची व विविध नाविण्यपूर्ण योजनांची माहिती सुनील लिमये यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.