मुंबई प्रतिनिधी, दि. ११ : कोविड-१९ च्या ओमायक्रॉन या नवीन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. २८ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे.
आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान, १८६० च्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.