दोंतुलवार सोपान मरखेलकर ( मदनुर ),दि.०२ मार्च मदनुर येथिल सोमलिंग गुट्टा येथे काल महाशिवरात्री निमित्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कामरेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल स्थानिक सोमलिंग गुट्टा येथे दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्री निमित्य भगवान भोलेनाथ शिवशंकर आणि माता पार्वती चा विवाह करण्यात आला यावेळी जुक्कल निर्वाचन क्षेत्राचे आमदार हाणमंत शिदें डोनगांवकर यांनी प्रथम सोमलिंगांचे दर्शन घेतले गेले आणि यावेळी त्यांचे सोबत स्थानिक सरपंच दरसवार सुरेश , उपसरपंच बोईनवार विठ्ठल , गोविंद प्रसाद काकांनी , कंचिनवार हाणमन्डलु , गोपनवार शिवाजी , आदी शिवभक्ता समोर सोमलिंग मंदिराचें मुख्य पुजारी मुखेडकर महाराजाच्यां हास्ते आमदार हाणमंत शिंदें डोनगांवकर यांचा भव्य सत्कार करण्यात आले आणि नंतर सामुहिक अन्नदान या महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले.
यात शिवभक्त महिला – पुरुष भारी संख्या मध्ये उपस्थित राहुन या मंगल मय वातावरणात महाप्रसादाचे लाभ हजारोंच्यावर शिवभक्त लाभ घेतले यावेळी हाडें केलुर , नागराळ , भक्तापुर , तडगुर , अवलगांव , शक्करगा आदी गावातील शिवभक्त उपस्थित होते . आणि या वेळी हणुमान शर्मा , नारलावार सावकार , सच्चावार परिवार भारत उष्केलवार , तुळशिराम , आर. सुभाष कामशेरवार सावकार , ढगे परिवार , विनोद तम्मेवार आदीने तन – मन – धनाने मदत करून हा कार्यक्रम सफल करण्यात आले आहे.