देगलुर प्रतिनिधी, दि.०२:- देगलुर शहर शिवसेना सचिव पदी युवा सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना संपर्क प्रमुख मा श्री आनंदजी जाधव साहेब, जिल्हाप्रमुख मा श्री उमेश मुंडे साहेब यांच्या आदेशावरून समाजसेवक मा. श्री धनाजी भाऊ जोशी यांची देगलूर शिवसेना शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील साहेब, शिवसेना शहरप्रमुख बालाजी मैलागिरे साहेब, उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार साहेब , शिवसैनिक हणमंत राजुरे, आदी सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज माझी देगलूर शिवसेना शहर सचिव पदी नियुक्ती केल्याबद्दल मि पक्ष श्रेष्ठिंचा खूप खूप आभारी आहे अशी प्रतिक्रिया धनाजी जोशी यांनी दिली आहे.