पहिल्या सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येणार
मुंबई दि २५ : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त सोडतीच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते झाला.
नवीन प्रशासकीय इमारत येथे हा कार्यक्रम झाला. १२ एप्रिल २०२२ रोजी सायं. ०४ .०० वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या ८६०२ आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू.५१ ,०० ,००० /- असून, तिकीटांची किंमत रू. २०० /- आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. ९८ ,५५ ,००० आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, श्री. प्रशांत पाटील, उपसंचालक (वित्त व लेखा), श्रीमती आशा ठोंबरे, कक्ष अधिकारी तथा राज्य लॉटरी श्रीमती शीला यादव, लेखा अधिकारी संदेश ओव्हाळ, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनिल लोटणकर, तसेच विविध लॉटरी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी सर्वश्री गणेश कदम, चंद्रकांत मोरे, दिलीप धुरी, सुहास महाडीक , रमाकांत आचरेकर, विलास सातार्डेकर व सुरेश भगत, प्रमुख लॉटरी विक्रेते श्री. मनिष शहा, उपस्थित होते. विलास सातार्डेकर, संस्थापक-अध्यक्ष, महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना यांनी शुभारंभप्रसंगी १००० तिकीटे खरेदी केली. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व लॉटरी तिकीट वितरक यांनी गुढीपाडवा भव्यतम सोडतीच्या लॉटरी तिकीटांची शंभर टक्के विक्री करण्याचे आश्वासन दिले.