नरसी प्रतिनिधी,दि.२५ :- नरसी येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता.त्या मेळाव्यास शिवसेना सचिव तथा खासदार अनिलजी देसाई यांची उपस्थिती होती.
देगलूर तालूक्याचे तालूका प्रमूख व उप जिल्हा प्रमूख यांना पदमूक्त करावे व देगलूर तालूक्याला सर्वसमावेशक व सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालनार्या,सर्वांच्या अडी-अडचनीला धाऊन येनार्या ज्याच्या कार्यातून कार्यकर्त्यांच व पक्षाच भल होईल व शिवसेना वाढेल असा तालूका प्रमूख व उप जिल्हा प्रमूख निवडावा यासाठी निवेदन देताना .
‘हम बोलेसो कायदा’ कोनांही शिवसैनिकांना विश्वासात न घेता आपल्याच त्वेशात राहनारा,फक्त मी आणि मिच हि भावना न ठेवनार्या,पक्षात फक्त माझच चालल पाहिजे,पक्षाच नूकसान झाल तरी चालेल मला कांहिच फरक पडनार नाही,हि भावना जोपासनारा,पक्षातून निष्ठावंतांना पक्ष सोडून जायला भाग पाडनारा कार्यकर्त्यांच फक्त निवडनूकीपूरत वापर करनारा,माझ वरपर्यंत लिंक आहे त्यामूळे माझ कोनी वाकड करु शकत नाही,अस आपल्या वर्तवणूकीतून वेळोवेळी दाखवून देनारा. चव्हान साहेबांपूढे माझच वजन वाढल,केवळ माझ्यांमूळेच आघाडीचा उमेदवार निवडला, निवडीमध्ये शिवसैनिकांचा कांहिच रोल नव्हता अस दाखवून देनारा,पालकमंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमास हजर राहून भलेही त्या कार्यक्रमास स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचा बँनरवरती फोटो नसला तरी चालेल पण पालकमंत्र्यापूढे आपली हजेरी व आमचे फोटो टाका असा केविल वाना व हास्यास्पद बोलून प्रयत्न करनारा.
कायम खूर्चिला चिटकून बसलेल्या तालूका प्रमूख व साबणें साहेबांच्या जान्याने बळजबरीने पद भेटलेल्या उपजिल्हाप्रमूखांना पदमूक्त करुन आपल्या आई सारख्या शिवसेनेला तालूक्यात मरेपर्यंत जिवंत ठेवावे .हिच विनंती करून निवेदन दिलोत.
शेवटि आम्हि मातोश्री चाच आदेश पाळनारे शिवसैनिक.