डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळांची सहविचार सभा संपन्न

देगलूर (प्रतिनिधी), दि. ०३ एप्रिल:- देगलूर येथील सिद्धार्थ नगर मधील नागार्जुन बुद्धविहारात विविध जयंती मंडळ प्रमुखांची बैठक घेण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शांततेत व सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून साजरी करावी.
या अनुषंगाने दिनांक ०३/०४/२०२२रोजी सकाळी ११ वाजता नागार्जून बुद्धविहारात शहरातील विविध नगर यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या मिरवणुकीचे नियोजन करण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व जयंती मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी या वर्षाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक शांततेत व शिस्तीत काढण्याचे निश्चित केले व जनतेत सामाजिक प्रबोधन व्यसनमुक्ती राष्ट्रीय चेतना जागृती या संदर्भाने मिरवणुकीत देखावे निर्माण करण्याचे ठरले.


या वर्षाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असे की भारतीय बौद्ध महासभा शाखा देगलूर च्या वतीने विविध मिरवणुकांचे निरीक्षण करण्यात येणार असून वेगवेगळ्या निकषांच्या आधारे प्रथम येणाऱ्यास फिरते ढाल बक्षीस, पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सदरील निकषांमध्ये सिस्त, सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय चेतना, शांततेचा संदेश, व्यसनमुक्त मिरवणूक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर व विचारावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन याचा समावेश असणार आहे असे सदरील बैठकीत ठरले. तसेच १४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९ च्या दरम्यान शहरात समता सैनिक दलाचे संचलन होणार आहे.
या बैठकीला नागार्जुन बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष माननीय धोंडीबाजी कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.भिमराव माळगे, सरचिटणीस प्रा. रामचंद्र गायकवाड, शहराध्यक्ष संजय कांबळे, कोषाध्यक्ष भिमराव देगलूरकर, संरक्षण सचिव विनय कांबळे,संघटक मिलिंद कावळगावकर, संघटक मिलिंद वाघमारे, शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रतिनिधी म्हणून माजी नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर,सिद्धार्थ नगर जयंती मंडळाचे अध्यक्ष विकास नरबागे, उपाध्यक्ष सचिन वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जयंती मंडळाचे अध्यक्ष दीपक पाळेकर, सचिव प्रदीप ढवळे, जय भिम नगर जयंती मंडळाचे अध्यक्ष शुभम वाघमारे, उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी, नागसेन चौक जयंती मंडळाचे अध्यक्ष पंढरी कांबळे, सचिव रत्नदीप मदने, गौतम नगर जयंती मंडळाचे अध्यक्ष कपिल दुगाणे, सचिव विजय बकरे, फुलेनगर जयंती मंडळाचे अध्यक्ष भारतरत्न ढवळे, सचिव साईनाथ तोटरे, व विविध जयंती मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *