गौतम बुद्धाचा संदेश आत्मसात करा- पालकमंत्री बच्चू कडू

अकोला दि.०५   तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शातंतेचा संदेश दिला. त्यांच्या संदेश आत्मसात करुन समाज विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज मंगरुळ कांबे येथे  केले. तसेच मंगरुळ कांबे येथे विपश्यना केंद्र, मुलांकरीता क्रीडांगण  व गावातील विकास कामे पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केले.

मुर्तिजापूर तालुक्यातील मंगरुळ कांबे येथे बौद्ध श्रामनेर शिबीर व धम्म परिषद कार्यक्रमास आज पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली.  त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सम्राट डोंगरदिवे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसिलदार सुनिल पवार, सरपंच सुभाष वाकोडे, उपसरपंच अभय कांबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते बुद्धपाज, श्रामनेर दीक्षा उपाध्याय भन्ते विनयपाल, शिबीर प्रशिक्षक भन्ते एस. नागसेन, भन्ते राहूल बोधी, भन्ते धम्मसार, शिबीराचे संयोजन भन्ते राहुल वंश, भन्ते संघवर्धन व मंगरुळ कांबेचे ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातील दीप प्रज्वलन करुन गौतम बुद्धांच्या मुर्तिस वंदन केले. त्यानंतर धम्म सम्राट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा कर्मयोगी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर सम्राट डोंगरदिवे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भन्ते, बौद्ध उपासक व उपासिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *