रस्त्याच्या दुतर्फा मुरूम टाकली नाही; काम गुणनियंत्रणाच्या कक्षेबाहेर
देगलूर विशेष प्रतिनिधी, दि. ११:- या बाबत सविस्तर वृत असे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्र.रा.मा.०७ ते पिंपळगाव या रस्त्याचे काम प्रतीक कंस्टरक्षण कंपनी नांदेड यांना मिळाले होते पन नेहमी प्रमाणे ते काम त्यांनी टक्केवारी घेवून दुसऱ्याला दिले व दुसऱ्यानी तिसऱ्याकडून ते काम करून घेतले. त्यात रस्त्याचे काम सुरू असताना मजूर मिळत नाहीत म्हणून गूत्तेदार काम अर्धवट सोडून निघून गेला त्यानंतर त्या कामाकडे संबंधित अधिकारी व गूत्तेदार यांनी पाठ देखील फिरवली नाही सहा महिन्याचा कालावधी लोटून गेल्यानंतर हा रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी देगलूर येथील सा.महिमा खादीचा या साप्ताहिकाचे संपादक गजानन बीडकर व दै.महासागरचे सतीश कयादारे यांनी संबंधित कार्यालय नांदेड येथे चार महीने सतत पाठ पुरावा करून अधिकाऱ्याला धारेवर धरले सुरवातीला अधिकारी वर्गानी या बाबतीत कानाडोळा केला पान सततच्या पाठ पुराव्यानंतर अखेर त्यांनी गूत्तेदाराला काम करण्यास भाग पाडले.
चार महीने पाठ पुरावा केल्यानंतरही काम सुरू करत असल्याचे साधे पत्र ही दिले नाही, किंवा सूचनाही केली नाही. गुपचुप येऊन रस्ता करून पसार झाले. पण नेहमी प्रमाणे ही काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले असून यावेळी देखील काम सुरू असताना अधिकारी वर्ग हजर नसेल किंवा भ्रष्टाचाराने आपले खिशे गरम केले असतील असा सुर गावात येतो आहे.
या रस्त्याची कामाची चौकशी औरंगाबाद गुण नियंत्रण अधिकारी यांच्या देखरेखित व्हावी अश्या मागणीचे पत्र देणार असल्याची माहिती गजानन बीडकर यांनी यावेळी दिली.